नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबर रोजी घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या तिन जणांना वजिरबाद पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नवीन हस्सापूर भागात 19 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता एका घरात शिरुन तिन चोरट्यांनी घरातील लोकांना मारहाण करून 6 हजार रुपये रोख रक्कम आणि एक आयफोन चोरून नेला होता. दरोडेखोरांनी त्यावेळी लोखंडी गज, कत्ती आणि खंजीर असे धारदार शस्त्र वापरले होते. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 466/2024 दाखल होता.
वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणाची इत्यंभूत माहिती जमवत साजिद अली खान साबेर अली खान (23) रा.खडकपूरा नांदेड, सय्यद उमर सय्यद फारुख (22) रा.लेबर कॉलनी आणि शेख रेहान शेख बबलू(19) रा.बालाजीनगर महाराणा प्रताप चौक नांदेड या तिघांना पकडले. त्यांच्याकडून दरोड्यातील 6 हजार रुपये रोख रक्कम आणि काही धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाने या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका आदींनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे, पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले, पोलीस अंमलदार मनोज परदेशी, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, शेख इमरान शेख एजाज, रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार, प्रदीप भद्रे आणि मनोज राठोड यांचे कौतुक केले आहे.