मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन

नांदेड :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 24 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवकांनी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार केले आहे.

या मेळाव्यात सर्व शासकीय /निमशासकीय आस्थापना व सहकारी संस्था, औद्योगिक आस्थापना, लाभार्थी उमेदवार यांचा सहभाग असणार आहे. कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी सहा महिण्याचा राहील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 12 वी पास युवकांना 6 हजार, आयटीआय पदविका 8 हजार, पदवीधर, पदव्युत्तर  विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरुप

मुख्यमंत्री युवार कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5 हजार 500 कोटीची तरतुद, उमेदवाराचे वय 18 ते 35 या वयोगटातील असावे, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग, स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी सहा महिण्याचा राहील. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत 12 वी उत्तीर्ण 6 हजार रुपये, आयटीआय व पदविका उत्तीर्ण 8 हजार रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण 10 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे इंटर्नशिप उमेदवारांना रोजगारक्षम करुन उद्योगासाठी मनुष्यबळ तयार करणार. प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य रोजगार व उद्योजकता केंद्राच्या 02462-251674 किंवा 9860725448 व nandedrojgar01@gmail.com वर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!