बिलोली(प्रतिनिधी)- मंदिराचे ओट्यावर का बसलास असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करुन डोक्यात दगड घालुन खून करणाऱ्या १२ आरोपीस बिलोली न्यायालयाने आज (दि.२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्या. दिनेश ए. कोठलीकर यांनी आरोपी निळकँठ जगन्नाथ पाटील (वय ४४), सोमनाथ होनयप्पा स्वामी (वय ५३), हणमंत हावगी स्वामी (वय ३०), शंकर संगप्पा स्वामी (वय ३८), अमृत आनेप्पा बिरादार (वय ५३), शिवाजी रामचंद्र मदने (वय ४४), गणेश नागनाथ हत्ते (वय ३२), शंकर सिद्राम हत्ते (वय ४७), सुरेश माधवराव कवरगे (वय ४८), जगन्नाथ हणमंतराव पाटील (वय ६८), सुभाष संगप्पा हत्ते (वय ५७), सुनील मलीकार्जुन पाटील (वय ३२, सर्व रा. माँ. कोकलगांव ता. देगलूर) जन्म ठेपेची शिक्षा व दंड रुपये ५०००/- प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेतून मयताच्या वारसाना १ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे. असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदिप बी. कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात अशोक तानाजी विरकर (पोलीस उपअधिक्षक) यांनी तपास केला. तसेच मरखेल पोलिस ठाण्यातील पैरवी अधिकारी साईनाथ एमेकर यांनी सहकार्य केले.