अर्धापूर(प्रतिनिधी)-विना परवाना वाहतुक करणाऱ्या बैलांसह टेम्पो अर्धापूर पोलीसांच्या ताब्यात.
शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालय परिसरात रात्री 3 वाजेच्यासुमारास एका टॅम्पो मधून परवाना नसतांनाही चार बैल घेवून जात असल्याचे पेट्रोलिंग करत असतांना अर्धापूर पोलीसांना आढळून आले. याबाबत वाहनचालकासह विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन चालक, बैलांसह टेम्पो अर्धापूर पोलीस ठाण्यात आणून वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले असता त्यांना रात्री 3 वाजेच्यासुमारास शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर एक बोलोरो पिकप आढळून आला आणि त्या वाहनास थांबवून वाहन धारकास नाव विचारून माहिती घेतली असता तो संशयास्पद उत्तरे देत होता. यावेळी तपासणी केली असता वाहनात चार पांढऱ्या रंगाचे बैल असल्याचे आढळून आले. यावेळी त्याला परवाना बाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. वाहन क्रमांक एम.एच.26 ए.डी.9315 अंदाजे किंमत 5 लाख रुपये व वरील चार बैलांची अंदाजित किंमत 75 हजार रुपये असा एकूण 5 लाख 75 हजार रुपयांचा मुदेमालासह वाहन चालक रशिद खान आबास खान (35) रा.जवळा पांचाळ ता.कळमनुरी जि.हिंगोली याला ताब्यात घेवून अर्धापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्याच्याविरुध्द कलम 11(1)(डी)(ई) सह गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.यावेळी पोलीस उपनिरिक्षक बाबूराव जाधव, पोलीस अंमलदार डांगे, कदम यांची उपस्थिती होती.