पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते मोबाईलचे वितरण; भाग्यनगर पोलिसांच्या विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांचे गहाळ झालेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत भा नगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तब्बल ३० अँड्रॉइड मोबाईल फोन शोधून काढले. अंदाजे ४ लाख ५८ हजार रुपये किमतीचे हे मोबाईल १३ ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत भा नगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने प्रभावी कामगिरी करत विविध ठिकाणांहून ३० मोबाईल शोधून हस्तगत केले. मोबाईलचा आयएमईआय (IMEI) क्रमांक, उपलब्ध पोलीस अभिलेख तसेच सीईआयआर (CEIR) प्रणालीच्या माध्यमातून गहाळ आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून पोलिसांनी मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या नियोजित भेटीदरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते सर्व ३० मोबाईल संबंधित तक्रारदार आणि मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत देण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मोबाईल हरवल्यामुळे होणारी आर्थिक हानी आणि मानसिक त्रास कमी झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच नांदेड पोलिसांचे आभार मानले. या पथकाने बजावली कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वजने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले, बालाजी महाजन, अनुपमा कत्ते, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, सचिन सोनवणे, कोंडीबा केजगीर, नरेश वाडेवाले, संकेत सवराते, साहेबराव कसबे वाड तसेच पोलीस अंमलदार व्यंकट गंगूलवार, ममता गुळवे आणि व्यंकटेश सांगळे यांनी ही कामगिरी पार पाडली. मोबाईल हरवल्यास तातडीने तक्रार करा नागरिकांचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार नोंदवावी. तसेच केंद्र सरकारच्या सीईआयआर (Central Equipment Identity Register) पोर्टलवर मोबाईलची माहिती नोंदवावी. मोबाईलचा आयएमईआय क्रमांक सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. या माहितीमुळे गहाळ मोबाईल शोधण्याच्या प्रक्रियेत पोलिसांना मदत होऊ शकते. नागरिकांची हरवलेली मालमत्ता शोधून ती त्यांना परत मिळवून देण्यासाठी नांदेड पोलीस प्रयत्नशील असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिल्लीत लोकशाहीची हत्या! जंतरमंतरवर आंदोलकांचे गळे आवळले, महिला कार्यकर्त्यांची रानटी फरफट; वाचा थेट ग्राऊंड रिपोर्ट!