जुना वाद उफाळला; तरुणावर खंजर, तलवारीने जीवघेणा हल्ला नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर खंजर, तलवार आणि दगडाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना नांदेड शहरातील देगावचाळ परिसरात घडली. या प्रकरणी विजराबाद पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत सातही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून २८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फिर्यादी मनोज प्रल्हाद माने (वय ३२, व्यवसाय व्यापार, रा. सोमेश कॉलनी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी मनोज माने आणि जखमी शंकर माने हे दुचाकीवरून हार्डवेअर दुकानासमोर साहित्य आणण्यासाठी गेले होते. यावेळी देगावचाळ येथील दुकानासमोर आरोपींनी त्यांना गाठले. गणेश मंडळाजवळ जास्त बोलत असल्याच्या कारणावरून ‘आता खतम करून टाकतो’ अशी धमकी देत आरोपींनी शंकर माने यांच्यावर खंजर व तलवारीने वार केले. तसेच दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(३), ११८(१), ११५(२), ३५१(१), ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सातही आरोपींची नावे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विजराबाद पोलिसांनी शोधमोहीम राबविली. गुन्हे शोध पथकाने दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सातही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.. रोहित उर्फ सोनू रमेश गोडबोले (वय २५, व्यवसाय बेकार, रा. देगावचाळ, नांदेड). जब्बा उर्फ आदित्य दयानंद हटकर (वय १९, व्यवसाय मजुरी, रा. देगावचाळ, नांदेड).रोहन माधव नवघडे (वय २३, व्यवसाय मजुरी, रा. देगावचाळ, नांदेड). अजय गौतम थोरात (वय २५, व्यवसाय मजुरी, रा. देगावचाळ, नांदेड). सुजल गणपत बहादुरे (वय १९, व्यवसाय मजुरी, रा. देगावचाळ, नांदेड). अभिजीत भागेंद्र नरवाडे (वय २६, व्यवसाय मजुरी, रा. देगावचाळ, नांदेड). कुणाल रमेश नवरे (वय १९, व्यवसाय मजुरी, रा. देगावचाळ, नांदेड). वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक ४, नांदेड यांनी गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन सर्व आरोपींना २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लोढे, विजराबाद पोलीस ठाणे, करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच नांदेड शहराचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्येंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लोढे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार शिवासांब मठपती, विलास कदम, ज्वालासिंघ बावरी, संतोष पोकळे, संतोष पावडे, भाऊसाहेब राठोड, इमरान पठाण आणि किशोर जयस्वाल यांनी या कारवाईत सहभाग घेतला. Kanthak Suryatal Post Views: 26 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्ञानेश कुमार गद्दार आहे! – थेट घराच्या भिंतींवर कालिख फासून तीव्र जनक्षोभ; लोकशाहीच्या मारेकऱ्यांचा बुरखा फाटला! चिराग पासवान प्रश्न विचारतात अन् उत्तर नड्डा देतात; जे. पी. नड्डा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले का?