निःशुल्क आधार कार्ड शिबिर, इंडिया पोस्टच्या विविध योजनांची माहिती व भव्य रक्त तपासणी शिबिर नांदेड : सामाजिक बांधिलकी जपत सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या सेवेसाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा सेवा उपक्रम दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत, श्री झूलेलाल भवन, झूलेलाल मंदिराजवळ, बाफना रोड, सिंधी कॉलनी, नांदेड येथे होणार आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांसाठी निःशुल्क आधार कार्ड शिबिर, तसेच इंडिया पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन देणारे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या सहकार्याने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून नागरिकांना आवश्यक शासकीय व सामाजिक सुविधांची माहिती मिळण्यासोबतच आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व जनसेवेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, जेठवाणी मित्र परिवार आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने नांदेडकरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या सर्व समाजोपयोगी उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्थळ : श्री झूलेलाल भवन, झूलेलाल मंदिराजवळ, बाफना रोड, सिंधी कॉलनी, नांदेड दिनांक : २७ सप्टेंबर २०२६, रविवार वेळ : दुपारी १२.०० ते 3.०० वाजेपर्यंत Kanthak Suryatal Post Views: 75 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने नांदेड शहर दुमदुमले