छत्रपती संभाजीनगर (विमाका) – ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र पदवीधर नागरिकांसाठी मतदार नोंदणी करण्याची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश विचारात घेऊन मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. या मतदारसंघासाठी नामनिर्देशनाची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असल्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करणे,वगळणे,दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने फॉर्म स्वीकारण्याची २६ सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. दिनांक २६ सप्टेंबर २०२६ नंतर कोणताही नवीन अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाला तरी त्याच्यावर कार्यवाही केली जाणार नाही. तसेच ६ ऑक्टोबर २०२६ नंतर मतदार यादीत कोणतीही दुरुस्ती, समावेश किंवा वगळणी केली जाणार नाही. सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पात्र नागरिकांनी आपले फॉर्म-१८ संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी सादर करावेत किंवा ऑनलाइन नोंदणी महाइलेक्शन डॉट जीओव्ही डॉट इन( http://mahaelection.gov.in )या संकेतस्थळावर करावी. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पात्र पदवीधरांनी या अंतिम संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी केले आहे Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माझा एनकाउंटर झाला तरी चालेल, पण देश जागा झाला पाहिजे! : सोनम वांगचुक यांचा खळबळजनक घणाघात, दिल्लीच्या वर्तुळात तीव्र खळबळ!