नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात अवैध औषध व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारला जात असताना सर्व नियम आणि कडक कारवाई फक्त किरकोळ (रिटेल) औषध विक्रेत्यांवरच का? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील किरकोळ औषध विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासन एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर विविध कडक नियम लादून एका दिवसात दुकान बंद करण्याची कारवाई करत असताना, त्यांना सप्लाय करणारे घाऊक (होलसेल) विक्रेते मात्र नामानिराळे राहत आहेत, असा आरोप होत आहे.किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यासह महाराष्ट्रात आज जो काही अवैध औषध व्यवसाय चालू आहे, त्याचा पुरवठा करणारे मुख्यत्वे काही ठोक विक्रेते जबाबदार आहेत. तसेच आज होलसेल व रिटेल क्षेत्रात औषध व्यवसायाचा कुठलाही अनुभव नसलेले लोक मोठ्या प्रमाणात शिरले आहेत. डॉक्टरांना होणारा सप्लाय, शेड्यूल H आणि नार्कोटिक्स ड्रग्जचा भरमसाठ सप्लाय यावर प्रशासनाने अंकुश ठेवला पाहिजे.बोगस डॉक्टरांना बंद मेडिकलच्या नावाने सप्लाय; करोडोंचा GST बुडतो – वरिष्ठ फार्मासिस्ट प्रसाद वाघमोडे आज शहरासह जिल्ह्यात औषधी निरीक्षकाची पथक येउन किरकोळ विक्रेत्यांना तपासणी नावाखाली त्रासदेत आहे तर दुसरीकडे अवैध व्यवसायाला कारणीभूत असलेले ठोक विक्रेते मात्र मूग गिळून गप्प देखाव्याची भूमिका बघत आहेत या विषयावर प्रतिक्रिया देताना वरिष्ठ फार्मासिस्ट प्रसाद वाघमोडे म्हणाले की, आज शहरात व जिल्ह्यात अनेक बोगस प्रॅक्टिस करणारे स्वयंघोषित डॉक्टर आहेत. ज्यामध्ये होमिओपॅथी, इलेक्ट्रोपॅथी तसेच कंपाउंडर, सिस्टर यांना सरळसरळ होलसेलर औषधी पुरवठा करतात. बंद झालेल्या मेडिकलच्या नावाने औषधे सप्लाय केली जातात. यामध्ये 2013 च्या कायद्यानुसार सर्जिकल मेडिसिन जसे की Dispo Syringe, IV Set याचा तर कुठलीही पावती नसते, बिलच नसते. त्यामुळे सरकारचा करोडो रुपयांचा GST बुडतो. यावर FDA ने स्वतंत्रपणे घाऊक विक्रेत्यांची कसून तपासणी केल्यास अनेक कर बुडवे आणि शेड्यूल H चा गैरवापर करणारे होलसेलर उघडे पडतील. Kanthak Suryatal Post Views: 265 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रोजगार महाकुंभांतर्गत 29 सप्टेंबर रोजी राज्यभर 500 रोजगार मेळावे;नांदेडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासींच्या संघर्षाची प्रभावी कहाणी रंगमंचावर; जंगोम नाटकाचा नांदेडमध्ये विशेष प्रयोग