नांदेड (प्रतिनिधी) -पत्नीला आपल्यासोबत नांदू देत नसल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेदांतनगर, मालेगाव रोड परिसरात घडली. या प्रकरणी नितीन अशोक धमणे (वय ३०, रा. वेदांतनगर, नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आरोपी नितीन धमणे याने फिर्यादी अशोक विठ्ठलराव धमणे यांच्या मुलाला, कृष्णा अशोक धमणे, याला शिवीगाळ केली. तुम्ही माझ्या बायकोला माझ्यासोबत नांदू का देत नाही, असे म्हणत आरोपीने त्याच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने गळ्यावर व तोंडावर वार केले. या हल्ल्यात कृष्णा याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर फिर्यादी अशोक धमणे यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी नितीन धमणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(३) तसेच शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कसबे करीत आहेत. घटनेमागील कौटुंबिक वादाची अधिक माहिती तपासातून समोर येणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 901 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हज यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन सौ.अरुणा खडकेकर यांचे निधन