नांदेड – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व विनापरवाना वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत उस्माननगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. लोहा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी तब्बल 80 लाख 33 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 2 सप्टेंबर 2026 रोजी उस्माननगर पोलिसांना गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कामळज, ता. लोहा येथील नदीपात्रात तसेच परिसरात पाहणी केली. यावेळी अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत चार लोखंडी फायबर बोटी, दोन छोटे इंजिन आणि साठवलेली 10 ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गणेश उर्फ गुलाब माधवराव उबाळे, अरविंद निवृत्ती कांबळे, अविनाश विश्वनाथ शिराळेकर आणि किशन दिगंबर ढगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 80 लाख 33 हजार 220 रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 190/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 303(2), 3(5) तसेच खान व खनिज अधिनियमातील कलम 4 व 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उस्माननगरचे सपोनि महेश मुळीक, पोउपनि गजानन गाडेकर, पोलीस अंमलदार सुनील सूर्यवंशी, माधव पवार, चिचोरे तसेच होमगार्ड यांनी केली. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 717 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुखेड भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा सापळा; १५ हजारांची लाच घेताना शिपाई रंगेहात ताब्यात, निमतानदारावरही गुन्हा दाखल! पत्नीचा खून करणार्यास जन्मठेप