नांदेड (विशेष प्रतिनिधी) – आपल्या पोलीस परिक्षेत्रातील नागरिकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे विशेष मेहनत घेत आहेत. याच कर्तव्याचा भाग म्हणून आज त्यांनी जवळपास 37 तक्रारदारांच्या अर्जांची प्रत्यक्ष तपासणी केली आणि त्यांना योग्य दिशा दाखवून दिली. नागरिकांच्या चिंतेची त्वरित दखल आज आलेल्या तक्रारदारांपैकी काहींनी पोलिसांकडे वारंवार चकरा मारूनही स्थानिक पोलीस आमची तक्रार घेत नाहीत अशी तक्रार केली. मात्र, अशा तक्रारींवर केवळ वेळ घालवण्यापेक्षा, दूरवरून आलेल्या नागरिकांची चिंता शहाजी उमाप यांना अधिक महत्त्वाची वाटली. त्यांनी लोकांच्या समस्यांचे निवारण कशा पद्धतीने लवकरात लवकर करता येईल यावर विशेष भर दिला. यासाठी त्यांनी संबंधित प्रकरणांमध्ये त्वरित प्रभावाने दखल घेण्याचे आदेश जारी केले आहेत. अविरत परिश्रम आणि तात्काळ तोडगा शहाजी उमाप हे दर महिन्याला आपल्या पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी वेळ देतात. आजच्या या तक्रार निवारण कक्षासाठी अगदी देगलूर,मुक्रमाबाद आणि मुखेड सारख्या भागांतूनही तक्रारदार आले होते. या सर्व लोकांचे म्हणणे त्यांनी अत्यंत शांतपणे ऐकून घेतले, त्याचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यावर काय योग्य मार्ग काढता येईल यादृष्टीने सर्वांना दिशा दाखवली. उमाप यांच्या या कार्यतत्परतेमुळे, ते स्वतःच्या कार्यालयात जाण्यापूर्वीच अनेक नागरिकांच्या तक्रारींचे निवारण झाले होते. आज दुपारी ३ वाजेपासून जवळपास सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सातत्याने वेळ देऊन त्यांनी आलेल्या सर्व तक्रारदारांना योग्य दिशा दाखवली आणि पोलीस विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही योग्य मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रसंगी जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,जिल्ह्यातील सर्व पोलीस उप विभागांचे पोलीस उप अधीक्षक,शहरातील सर्व पोलीस निरीक्षक आणि जवळपासचे सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 670 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर हल्ला नांदेड जिल्हा पोलीस दलातील १३ अधिकारी-अंमलदारांना भावपूर्ण निरोप