मुखेड (प्रतिनिधी) – अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. मारतळा ते मुखेड जाणाऱ्या रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पोलिसांनी पकडून त्यातील पाच ब्रास रेतीसह तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १५ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत टाटा कंपनीचा हायवा (क्र. MH-26 QW-7022) अडवून तपासणी केली. वाहनामध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीसंदर्भातील वैध परवाना व आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाचा रॉयल्टी महसूल बुडवून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. Kanthak Suryatal Post Views: 380 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धनेगाव पेट्रोल पंपावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कडेकोट दक्षता; एकाला न्यायालयीन तर चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी नांदेडमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त