नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वजीराबाद पोलिसांची कारवाई : दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जाफरखान नजरखान यांच्या घरासमोर, नांदेड येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी मोहम्मद माजिद मोहम्मद हाजी (वय ३१, रा. फारुखनगर, नांदेड) याच्यासह अन्य आठ जण बेकायदेशीररीत्या जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, चार मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा ५३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलिसांची कारवाई : त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नेरळी शेतशिवार, नांदेड येथेही पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. येथे आरोपी अनिलनाथ रामदास बैकर (वय २७, रा. नेरळी, नांदेड) याच्यासह अन्य पाच जण बेकायदेशीर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी रोख रक्कम, दोन मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा १ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत सुमारे १ लाख ५५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 550 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुखेड पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; हायवासह ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त शासकीय कामात अडथळा; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल