नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणावर खंजिराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पाच जणांसह इतरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी व मोबाईलचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभातनगर, नागसेन शाळेच्या ग्राउंड परिसरात ही घटना घडली. फिर्यादी साहिल ओंकार केजकर (वय १९, रा. हनुमान कॉलनी, नांदेड) याने दिलेल्या तक्रारीनुसार, मोनू पुंडगे, लक्की हटकर, लक्की हटकरचा भाऊ, गौरव थोरात, सुंदर भगत तसेच इतर काही जणांनी संगनमत करून त्याला अडविले. यावेळी संशयितांनी फिर्यादीला शिवीगाळ करत, ‘‘तू माझी बदनामी का करतोस?’’ असे म्हणत २० हजार रुपयांची खंडणीची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने खंजिराने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.या हल्ल्यात फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१), ३०८(४), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १२७(२), ३२४(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीसंदर्भातील नमूद तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करीत असून, पोलिसांनी संबंधित आरोपींवर अटकेची कारवाई केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 84 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये जबरी चोरीसह दोन ठिकाणी घरफोड्या;मोबाईल हिसकावताना पतीला मारहाण; नांदेड ग्रामीण हद्दीत ७.९० लाखांचा ऐवज लंपास नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ आठवड्यांत १२२२ गुन्हे दाखल, १५ कोटींचा मुद्देमाल जप्त