नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा कारभार किती गतीमान आहे, याचा प्रत्यय २८ जुलै रोजी पुन्हा एकदा आला. पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याला भेट दिली आणि तिथे जे काही घडले, ते पाहून उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल. ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळणारे उत्कृष्ट पोलीस अधिकारी श्रीमान ओमकांतजी चिंचोळकर यांच्या कामाची उमाप यांनी ज्या पद्धतीने प्रशंसा केली, ती पाहून अनेकांना आपल्या हसण्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले असावे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोळकर यांच्या कामाचा झपाटा इतका प्रचंड आहे की, त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारदारांच्या रांगा संपता संपत नाहीत. बिचारे उमाप साहेबही काय करणार? २०१० ते २०१२ या काळात नांदेडमध्ये सेवा बजावलेल्या आणि आता महानिरीक्षक पदावर दुसरे वर्ष पूर्ण करत असलेल्या उमाप यांना अखेर तक्रारदारांच्या अर्जांचे फोटो काढून ते संबंधित पोलीस ठाण्यांना पाठवण्याची डिजिटल पद्धत अवलंबवावी लागली. कामाचा वेग की आठवड्यांची प्रतीक्षा? संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे गेलेली कामे आठवडे उलटूनही का होत नाहीत, याचे गूढ कदाचित चिंचोळकर यांच्या कार्यतत्परतेत दडले असावे. तक्रारदारांशी चर्चा करताना जेव्हा हे वास्तव समोर आले, तेव्हा उमाप साहेबांनी चिंचोळकरांची जी काही पंचारती केली, ती काही उपस्थितांना चांगलीच भावली. ही पंचारती म्हणजे चिंचोळकरांच्या कार्यक्षमतेवर ओढलेले ताशेरे होते की कौतुक, हे ज्याचे त्याने ठरवावे, पण या प्रकारामुळे पोलीस दलातील शिस्त आणि वेळेचे पालन यांचा नवा नमुनाच समोर आला आहे. या संपूर्ण सोहळ्याला इतवारा उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे हे देखील साक्षीदार होते. एकूणच, तक्रारदारांच्या रांगा आणि प्रलंबित कामांचा डोंगर उपसण्याऐवजी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पंचारती करून घेण्याचे नवे कौशल्य नांदेड ग्रामीण पोलिसांनी आत्मसात केल्याचे दिसून येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 814 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जंतर-मंतरवर हिंसाचारासाठी प्लॅन्ट केले होते पुरावे? जनरल डायरीमधील त्या नोंदींनी उडाली खळबळ! मोदी सरकारचा कोर्ट गेम उघड? का अडून बसली आहे कॉकरोच जनता पार्टी?