नांदेड – सिद्धनाथपुरी, चौफाळा भागातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश बाबुराव हरकरे वय ५९ वर्षे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांचेवर शनिवारी दुपारी तारातीर्थ मार्कण्डेय घाट, स्मशानभूमी ब्रह्मपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, १ विवाहित मुलगाz १ अविवाहित मुलगा असा परिवार आहे. अंत्यविधीस नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर, चौफाळा परिसरातील नागरिक, शिवसैनिक, मराठा संघटनेचे पदाधिकारी, नातेवाईक, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. Kanthak Suryatal Post Views: 957 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान; १२ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याची अंगठी लंपास; दोघांविरुद्ध गुन्हा