नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करत सुमारे ₹65 हजार किमतीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 जुलै 2026 रोजी दुपारी 12.04 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास एलआयसी कार्यालय सिडको ते वसरणी ओव्हरब्रिज परिसरात ही घटना घडली. दोन अनोळखी इसमांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या साक्षीदाराला विश्वासात घेतले. त्यानंतर साक्षीदार प्रदीपसिंग गोविंदसिंग ठाकूर यांच्या हातातील सुमारे ₹65 हजार किमतीची सोन्याची अंगठी काढून घेत फसवणूक करून पसार झाले. या प्रकरणी चंद्रकांत हनुमंतराव नवकवार (वय 69, रा. बळीरामपूर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 906/2024 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS)-2023 कलम 319(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार यालावर करीत आहेत. पोलीस नागरिकांना अनोळखी व्यक्तींकडून पोलीस असल्याची बतावणी करून दागिने काढण्यास सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवू नये व तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 703 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्री गणेश हारकरे यांचे दुःखद निधन सायबर पद्धतीने ५१.३४ लाखांची ऑनलाइन फसवणुक