नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सुरू असलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान इतवारा पोलिसांनी अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे ₹30 हजार किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान प्रभारी अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक जळबा गायकवाड यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एक संशयित इसम गावठी पिस्तूल बाळगून फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेला खोचलेले सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपीकडे शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जळबा गायकवाड करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जळबा गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, नागरिकांनी कोणाकडेही अवैध शस्त्रे अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,178 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सक्षम हत्येचा कट रचल्याचा आरोप; मुख्य आरोपीच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधून साहित्य चोरी; तोडफोडीत ३२ लाखांचे नुकसान