आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्या करिता नांदेड–-मिरज–नांदेड दरम्यान आणखी विशेष रेल्वेगाडी चालविणार

नांदेड (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड येथून पंढरपूर येथे जाण्या करिता दोन गाड्या चालविण्यात येणार असल्याचे या पूर्वीच कळविले आहे.
त्या दोन गाड्या शिवाय आणखी एक विशेष रेल्वे गाडी नांदेड येथून चालविण्यात येणार आहे, ती नांदेड–मिरज–नांदेड दरम्यान धावेल.  ही विशेष गाडी 1.3 पट विशेष भाड्याने चालविण्यात येणार आहे.
विशेष गाडीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
गाडी क्र. 07639 नांदेड–मिरज विशेष गाडी (पंढरपूर मार्गे) : गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी नांदेड येथून रात्री 23:50 वाजता सुटून पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, ढाळगाव आणि कवठेमहांकाळ मार्गे शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथे दुपारी 12.50 वाजता आणि मिरज येथे सायंकाळी 17:50 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 07640 मिरज–नांदेड विशेष गाडी (पंढरपूर मार्गे): शनिवार, 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून रात्री 00:40 वाजता सुटून कवठेमहांकाळ, ढाळगाव, सांगोला, पंढरपूर, (04.30 वाजता) कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा मार्गे  त्याच दिवशी दुपारी 15:15 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या विशेष रेल्वेगाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे मिळून 24  डबे असतील. यात्रेकरूंनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा तसेच आरक्षण व वेळापत्रकाची माहिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांद्वारे अथवा जवळच्या रेल्वे स्थानकातून मिळवावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!