नवी दिल्ली (प्रतिनिधी)- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या काँग्रेसशी संबंधित युवक कार्यकर्त्यांना पोलिसांनी विविध ठिकाणी अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आल्याचे दिसत असून, अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते अभिजित दिपके यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळे हटवावेत आणि शांततापूर्ण मार्गाने संसद भवनापर्यंत जाऊ द्यावे, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव पुढे जाण्यास परवानगी नाकारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्याचा दावा आंदोलकांनी केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचा आरोप केला. अश्रुधूराचा परिणाम कमी करण्यासाठी काही स्वयंसेवक आंदोलकांना डोळ्यांवर ओला कपडा ठेवण्याचा सल्ला देत असल्याचेही व्हिडिओंमध्ये दिसत असल्याचा दावा आहे. तरीही अनेक युवक-युवती संसद भवनाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर आले. दरम्यान, विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका करत संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. संसदेबाहेर आंदोलन सुरू असताना सरकारचे लक्ष केवळ विधेयके मंजूर करण्यावर केंद्रित असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात आला. लोकशाहीत विरोधाचा आवाज ऐकण्याऐवजी दडपण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.इंटरनेट सरकारने बंद केले आहे. याचवेळी काही सोशल मीडिया पोस्टमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा, तसेच काही पोलिसांनी त्यांच्या गणवेशावरील नावाच्या पाट्या काढल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, अधिकृत सूत्रांनी अशा आरोपांना दुजोरा दिलेला नाही. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याचे सांगितले जात असून, अनावश्यक बळाचा वापर झाल्याचे आरोप फेटाळण्यात आल्याचे वृत्त आहे. संसदेच्या भिंतीबाहेर आंदोलन आणि आत विधिमंडळाचे कामकाज अशा दोन समांतर घडामोडींमुळे राजधानीत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात अधिकृत तपास, पोलिसांचे स्पष्टीकरण आणि सरकारची भूमिका समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 760 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांची ४ तासांत कारवाई