नांदेड – शहरातील तरोडेकर भाजी मार्केट हनुमान पेठ नांदेड येथे राहणारे ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.विश्वास नारायणराव देशमुख यांचे दि.१० जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, जावई, मुलगा, सून , नातवंडे असा परिवार आहे. ते मूळचे शिरडशहापूर जि.हिंगोलीचे रहिवासी असून गत अनेक दशकांपासून त्यांनी नांदेडमध्ये नेत्ररोग तज्ञ म्हणून कर्तव्य बजावले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजताशांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 831 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त; ३९ लाखांचा माल पकडला, आरोपीला पोलीस कोठडी नांदेडमध्ये मध्यरात्री युवकाची निर्घृण हत्या;पुन्हा एकदा नांदेड हादरले