नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कुंटूर पोलिसांनी राहेर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ₹५,०२,४५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष राहेर शेतशिवारातील ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकला. कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. छाप्यात ₹५४,४५० रोख रक्कम, १० अँड्रॉइड मोबाईल फोन (अंदाजे ₹८७,०००), ६ मोटारसायकली (अंदाजे ₹३,६०,०००) तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ₹५,०२,४५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७०/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली, पोलीस उपनिरीक्षक तिडके तसेच कुंटूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर धंद्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले असून अशा अवैध कृत्यांविरोधातील कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 986 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदावरी पात्रातील अवैध वाळू उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा; ५ आरोपींवर गुन्हा, ४५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ३१ हजारांच्या दारू व दुचाकी जप्त