नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेला खतपाणी घालणाऱ्या अमली गोळ्यांच्या अवैध विक्रीविरोधात इतवारा पोलिसांनी कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका वैद्यकीय एजन्सीच्या मालकासह संबंधित पुरवठादारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे ६ जुलै रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान एका तरुणाकडून अल्प्राझोलम-३०० या प्रतिबंधित औषधांच्या ५ बॉक्समधील एकूण ५०० गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांची अंदाजे किंमत १२ हजार ३५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चौकशीत संबंधित तरुणाने या गोळ्या नांदेडमधील एका मेडिकल एजन्सीतून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित एजन्सीची तपासणी केली असता, आरोपीने या गोळ्या अन्य एका एजन्सीच्या मालकाकडून घेतल्याचे सांगितले. तपासात या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करून तरुणांना व्यसनाच्या आहारी लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी श्याम सुभाषराव ससाणे (वय २८, व्यवसाय – एसएस फार्मा अँड सर्जिकल एजन्सी, कोठा, नांदेड) तसेच गुरुराज (औषध एजन्सी मालक) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ व ३(५) अन्वये इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.आता नशेच्या गोळ्या विक्री करणारे संपूर्ण राकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,152 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विद्यापीठात खळबळ: पीएचडी धारक विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या एसआयआरसाठी जनतेने सहकार्य करावे-राहुल कर्डीले