नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सुरु असलेल्या विशेष सखोल पुर्ननिरिक्षण कार्यक्रमामध्ये जनतेने बीएलओसोबत सहकार्य करावे आणि आपले नाव मतदार यादीत येईल यासाठी दक्षता घ्यावी. मतदार यादी शुध्द करणे, अचूक तयार करणे, पात्र मतदार एकही सुटणार नाही आणि अपात्र मतदार एकही मतदार यादीमध्ये राहणार नाही, असा मुळ उद्देश एसआयआरचा आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली. आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राहुल कर्डील यांच्यासोबत निवडणुक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा माहिती अधिकारी अल्का पाटील यांची उपस्थिती होती. दि.20 जून 2026 पासून सुरू झालेल्या कार्यक्रमात 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक ठेवण्यात आलेली आहे. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द होईल. मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर सुध्दा कोणी मतदार या यादीत आला नसेल तर त्याच्यासाठी सुध्दा वेगळी स्वतंत्र सोय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यासाठी एकूण 1 0 हजार 909 बीएलए नियुक्त करण्यात आले आहेत. सोबतच अनेक अधिकारी नियुक्त आहेत.नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या 27 लाख 72 हजार अशी आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 3 हजार 88 मतदार केंद्र आहेत. 86.22 टक्के मतदार मॅप करण्यात आले आहेत. अनोमली लिस्टमध्ये 4 लाख 92 हजार 337 मतदार आहेत. बीएलओ आणि बीएलए ला तीन भेटी घरी कोणी भेटले नाही तर त्यांच्यासाठी 4 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे मांडण्यास वेळ दिला आहे. अशा प्रकारे मतदार याद्यांचे सखोल पुर्ननिरिक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ, बीएलए यांच्यासोबत सहकार्य करून आपले नाव, आपल्या कुटूंबियांचे नाव मतदार यादीत येईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 598 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये अल्प्राझोलम-३०० अमली गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीतून विद्यार्थी ठरणार अपात्र ; नियम कडक