नांदेड (प्रतिनिधी)- सोनखेड येथील पेट्रोल पंपावर प्लंबर म्हणून काम करणारे मजूर किफायत अली यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, अशा कठीण प्रसंगी सांत्वनासोबतच आर्थिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त करत एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी किफायत अली यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले तसेच पक्षाच्या वतीने आर्थिक मदत म्हणून धनादेश आणि रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रसंगी एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला, पक्षनेते मसूद खान, नगरसेवक सय्यद मुजीब सय्यद मुक्तार, शमीम अब्दुल्ला, लतीफ लोखंडवाला, सय्यद फसीयोद्दीन, ॲड. नासीर, अल्ताफ हुसेन, हाफिज बागवान, रहीम खान तसेच माजी नगरसेवक अन्सार अहेमद खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. किफायत अली यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि त्यांना सर्वतोपरी मदत मिळावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. Kanthak Suryatal Post Views: 1,044 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दैनंदिन जीवनात योगाभ्यास महत्त्वाचा- जी.एस. ढवळे प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेची २.१० लाखांची खंडणी