नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत भाग्यनगर व रामतीर्थ पोलिसांनी सात आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फिर्यादी विजय महादेव पडोळे यांची स्कुटी व स्विफ्ट कार चोरीला गेली होती. तसेच रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी रावसाहेब विठ्ठल चव्हाण यांना अडवून मोबाईल व रोख रक्कम हिसकावून नेण्यात आली होती. या दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. भाग्यनगर पोलिसांनी चोरीस गेलेली स्कुटी व एक स्विफ्ट कार असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर रामतीर्थ पोलिसांनी चोरीस गेलेला मोबाईल फोन व खंजर असा १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत आकाश आनंदराव साबळे, विजय भगवानराव वानखेडे, अमोल आनंदराव नंदनकर, प्रल्हाद बाळाजी ससाणे यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. तसेच रामतीर्थ हद्दीतील प्रकरणात सय्यद हुसेन व शेख अजिज या आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने व श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, विक्रम हराळे तसेच त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. Kanthak Suryatal Post Views: 1,123 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किलर आणि एंजल: ट्रम्प यांनी मोदींची केलेली थट्टा आणि भारताचा अपमान बंगाल, महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशची वारी?