नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील सोनखेड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून नोंदविण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, 10 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास सुमित मोरगे पेट्रोल परिसरात सादिक अली खाजा मोईनोद्दीनचा भाऊ किफायत अली सोबत दोन जणांचा वाद झाला. या वादानंतर संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीत फिर्यादीचा भाऊ जखमी झाला आणि उपचारादरमायन मरण पावला. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तपासाची जबाबदारी संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.या तक्रारीत आरोपी सादरात बालाजी शिवाजी मोरे आणि पवन यादव या दोघांची नावे नमूद आहेत. संबंधित व्हिडिओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-10-at-21.57.06.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,765 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काँग्रेसचे पुनरुज्जीवन आणि मोदी-शाह यांच्या रणनीतीला धक्का इराण-अमेरिका युद्ध: शेवटच्या युद्धाची सुरुवात आणि जागतिक महासंकट