हिंगोली (प्रतिनिधी)- प्रशासकीय कारणास्तव हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व शाखांमध्ये कार्यरत असलेल्या ३९ पोलीस अंमलदारांची पुढील आदेशापर्यंत पोलीस मुख्यालय (पीएचक्यू) हिंगोली तसेच मोटार परिवहन विभागात तात्पुरती तैनाती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी याबाबतचे आदेश जारी केले.परवाच पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यानि हिंगोली जिल्ह्यात भेट दिली होती. त्यानंतर २४ तसाच पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी हे तैनातीचे आदेश जारी केले आहेत. तैनाती करण्यात आलेल्या अंमलदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : शेख मुजीबुर रहेमान शेख रहीम अझरउजमाखाँ शफीउजमाखाँ पठाण गणेश ज्ञानदेव वाबळे संतोष देवराव करे शेख मोहम्मद शेख अहमद रमेश संभाजी कोरडे रवी नारायण इंगोले प्रदीप प्रकाश राठोड शेख नूर शेख ताहेर शैलेश मुलचंद चौधरी राहुल विश्वनाथ गोटरे गोविंद सुभाषराव खांडेकर लिंबाजी नरहरी सदावत ओमनाथ भिकुलाल राठोड शिवाजी शेषराव पवार शेख अन्सार शेख समद गोसोद्दीन सिद्दीक शेख हबीब माधव किशनराव सूर्यवंशी शेख इक्बाल सिकंदर अब्दुल वसीम पठाण गजानन भिकाजी गिरो गजानन टोपाजी भालेराव संदीप सुरेश टाक प्रितम भिमराव चव्हाण प्रफुल्ल शिकोश आडे ताम्रध्वज प्रल्हादराव कासले अजय अशोक पंडीत सय्यद इम्रान सय्यद अशरफ संदीप भागोजी जोंधळे रामेश्वर धुराजी लोखंडे गजानन महादेव सांगळे संतोष उकंडी पटवे शंकर मसाजी हेंद्रे गजेंद्र सुभाष बेडगे नामदेव शामराव हावे फुलाजी शिवाजी सावळे धनंजय उत्तमराव पुजारी सुमित विनायकराव टाले विनोद देविदास कुटे यापैकी माधव सूर्यवंशी, प्रितम चव्हाण आणि संतोष पटवे यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे तैनाती करण्यात आली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.वेग वेगळ्या पोलिस ठाण्यातील हे ३९ पोलिस अमलदार आहेत. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत कार्यमुक्त करून नव्या तैनातीच्या ठिकाणी हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत. हिंगोलीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे नांदेड येथिल जनतेच्या तक्रारी ऐकणार आहे. ज्या प्रमाणे त्यांनी हिंगोलीतून आल्यानंतर हिंगोलीच्या 39 पोलीस अमलदारांची अचानक उचल बांगडी झाली आणि त्यांना मुख्यालयात जमा करण्यात आले त्याच पद्धतीचे,त्याच ताकतीचे पोलीस अंमलदार नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा आहेतच, यावर सुद्धा कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 720 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जपानची आंब्यावरील बंदी आणि भारताची नाचक्की सरकारी कंपन्यांना वाचवणारी LIC आता रसातळाकडे जाण्याच्या मार्गावर