जागतिक परिचारिका दिन  ग्रामीण रुग्णालय येथे साजरा

भोकर – आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस दि.१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) साजरा केला जातो.
फ्लोरोन्स नाइटिंगेल त्यांच्याच स्मरणार्थ जागतिक परिचारिका हा दिन साजरा केला जातो. जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड मा.डॉ.संजय पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) मा. डॉ. राजाभाऊ बुट्टे सर,वैद्यकिय अधिक्षक मा.डॉ प्रताप चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दि. १२ मे रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे  जागतिक परिचारिका दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.

फ्लोरोन्स नाइटिंगेल परिचारिका यांच्या प्रतिमेस ग्रामीण रुग्णालय भोकर येथील इन्चार्ज सिस्टर श्रीमती उज्वला पवार व सर्व अधिपरीचारिका यांनी पुष्पहार अर्पण व मेणबत्ती लावून अभिवादन केले.

श्रीमती मुक्ता गुट्टे आरोग्य सेविका यांनी प्रतिज्ञा वाचन केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी डॉ. विजयलक्ष्मी किनीकर, अधिपरिचारीका श्रीमती साधना भगत, संगीता ताटेवाड, संगिता महादळे, दिक्षा पाटील, संगीता भालेराव, प्रियंका बगळे,श्रीमती माटोरे, श्रीमती डवरे, श्रीमती भालेराव, आरोग्य सेविका संगीता पंदीलवाड, सरस्वती दिवटे व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील महिला कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!