मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर सर…! शिक्षण क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. त्यामध्ये नोबल हायस्कूल, लेबर कॉलनी, नांदेड येथील विद्यार्थीनी कु. तुबा फलक मकसूद पटेल लोहगावकर हिने 97.80 टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. तुबा फलक ही मराठवाडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष मकसूद पटेल लोहगावकर यांची कन्या असून बैतुल उलूम हायस्कूल, नांदेड चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख अहमद यांची नात आहे. घरातील शैक्षणिक वातावरण, अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षकवर्ग तसेच मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल नांदेडचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप कुमार बनसोडे, उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, अधीक्षक बळीराम यरपूलवार, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य वसीम भाई बुरहान यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नोबल एज्युकेशन सोसायटी, नांदेड चे सचिव अब्दुल वहीद, मुख्याध्यापक अब्दुल वदुद सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या यशाचे कौतुक करत भविष्यात ती आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेहनत, शिस्त आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते, हे पुन्हा एकदा कु. तुबा फलक हिने आपल्या उज्ज्वल यशातून सिद्ध करून दाखवले आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार परिवार कु. तुबा फलकचे अभिनंदन करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 845 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नरेंद्र मोदी ने हस हस कर भ्रष्टाचार के आरोप किये वही आज पश्चिम बंगाल के सीएम आस्था भालके हिचे घवघवीत यश, ९७. २० टक्के गुण घेत केले यश संपादन