इस्लापूर (प्रतिनिधी) – येथील मौजे शिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या प्रकारात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजय उद्धव वाघोरे (रा. शिवणी, ता. किनवट) याने शाळेतील पोषण आहाराचे तसेच फिर्यादी महिला शिक्षिकेचे फोटो मोबाईलमध्ये काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करतो, अशी धमकी देत ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी फिर्यादी महिला शिक्षिका यांनी दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 33/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 308(2), 356(3) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राठोड हे करत असून अधिक तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 657 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जवळा दे. येथे संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी नांदेड बस स्थानकात १ लाख ५८ हजारांची चोरी;नायगावच्या डिक्कीतून ५० हजारांची चोरी