नांदेड, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असून १५ एप्रिल २०२६ रोजी वजीराबाद व नायगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. वजीराबाद येथे दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरात फिर्यादी रंजित आनंदराव शिरसरे (वय ३३, रा. जाकापूर ता. कंधार) यांच्या जवळील पर्समधील सुमारे १ लाख ५८ हजार १५८ रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८४/२०२६, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नायगाव येथील हेडगेवार चौकात दुपारी सुमारे १२.५० वाजता दुसरी चोरीची घटना घडली. फिर्यादी राजेश कोडिबा जाधव (वय ४०, रा. सातेगाव ता. नायगाव) यांच्या मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. Kanthak Suryatal Post Views: 771 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शाळेतील शिक्षका आणि पोषण आहाराचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजारांची खंडणी मागणी; गुन्हा दाखल नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई; 1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त