नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत आज सलग चौथ्या वर्षी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर रामगीते कलावंतांनी सादर केली. यावेळी विशेष म्हणजे सामाजिक कार्य व धार्मिक कार्य करणार्या अॅड.व्यंकटेश पाटणूरकर व दिलीप ठाकूर यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
रसिक श्रोत्यांसाठी श्रवणीय पर्वणी ठरलेल्या या विलोभनीय उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष होते. कलागंण प्रतिष्ठान, श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अविस्मरणीय सोहळा साकार झाला. अॅड.गजानन पिंपरखेडे यांची संकल्पना व निवेदन तसेच पत्रकार विजय जोशी यांचे निर्मिती सहाय्य म्हणून प्रमुख भूमिका निभावली.
येथील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज पहाटे सहा वाजता आयोजित श्रीराम पहाट या भक्तिमय संगीतपर्वांचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ.नितीन जोशी, वेदशास्त्र संपन्न मनोजगुरू पेठवडजकर, भगिरथ राठी आदींची यावेळी उपस्थिती होती.
आज झालेल्या कार्यक्रमात प्रशांत काळुन्द्रेकर (मुंबई), प्रज्ञा देशपांडे (पुणे), संज्योती जगदाळे (मुंबई) आदी सुप्रसिद्ध गायक यांनी आपल्या सुमधुर स्वरात रामगीते सादर केली. एकापेक्षा एक सरस गितांनी त्यांनी आजची राम पहाट गाजवली. यात नादातूनी या नाद, उठी श्रीरामा, राम बरवा, विश्वाचा विश्राम, श्रीराम चंद्र कृपाळू, भजले राम, स्वयश्री रामप्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला, राम का गुणगान, ध्यान लागले, नाम घेता मुखी, बाधे जे रे मुरलीया, अवध मे राम आये है, आदी रामचरित्रावर आधारीत गिते सादर करुन रसिक, श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना मंदार गोडसे, विवेक परांजपे, यश सोमण, पंढरीनाथ दरेकर, पंकज शिरभाते, भगवान देशमुख या दिग्गज कलावंतांनी संगीतसाथ दिली.

या सर्व कार्यक्रमाचे निरुपण निवेदन कार्यक्रमाची संकल्पना असणारे प्रख्यात निवेदक अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केली. कार्यक्रमाच्या उद्घाटकीय सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी केले.रामसेवा गौरव पुरस्कार- यावेळी प्रभू श्रीराम यांचा १७ कोटी नामजप पूर्ण करणारे अॅड.व्यंकटेश पाटणूरकर व पवित्र अमरनाथ धाम येथील आतापर्यंत २७ यात्रा सफल करणारे अॅड.दिलीप ठाकूर यांना श्रीराम पहाट सोहळ्याच्या भव्य मंचावर रामसेवा गौरव पुरस्कार आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला श्री.स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी, नांदेड यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
श्रीराम नवमीच्या निमित्ताने व गोविंदगिरी देव महाराज व किशोरजी व्यास यांच्या कृपाशीर्वादाने सलग चौथ्या वर्षी आयोजित श्रीराम पहाट या अविस्मरणीय सोहळ्यात नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तर शिवप्रसाद राठी, रमेश मेगदे, शंतनू डोईफोडे, डॉ.सुरेश दागडिया, अॅड.चिरंजीलाल दागडिया, रमेश सारडा, नंदकुमार दुधेवार, राम शेट्टीतुप्तेवार, रमाकांत गंदेवार, बापू दासरी, माधवराव पटणे, अनिल शेटकार, रमेश मिरजकर, प्रणव मनुरवार, लक्ष्मीकांत बंडेवार, प्रा.प्रभाकर उदगीरे, श्याम राठी, विजय बंडेवार, जगजीवन सिंग रिसालदार, बालासाब मादसवाड, विजय डुमणे, पुरुषोत्तम देशपांडे, राजू कोटलवार, संतोष पाळेकर, कृष्णा केशटवार, नारायण आकमार, प्रसाद जोशी, रमेश सुरकुटवार आणि विजय बंडेवार यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.