येत्या काही कालावधीत इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने नवीन पोर्टल कार्यान्वित होणार असून याद्वारे कॉलेजचे रजिस्ट्रेशन करणे, शाखा व विषयांची नोंदणी करण्याचे काम कॉलेजला करावयाचे असून त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासन व विद्यार्थ्यांनी पूर्वीच पूर्वतयारी करुन आवश्यक कागदपत्रांची जूळवा-जूळव करुन ठेवावी, जेणेकरुन ऐनवेळी धावपळ होणार नाही व वेळेत रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हयात मागील वर्षी 256 कॉलेजमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यंदा देखील त्या सर्व कॉलेजमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने पुढील कागदपत्रे पूर्वीच तयार करुन ठेवावीत.
कॉलेज प्रशासनाने करावयाची पूर्वतयारी
* कॉलेज मान्यतेचे सर्व आदेश
* अतिरिक्त तुकडी, शाखा, विषय मान्यतेचे सर्व आदेश
* माध्यमाच्या उल्लेखासह असलेले खाते मान्यता आदेश
* मंडळ मान्यता आदेश
* सन 2024-25 ची संचमान्यता व तुकडीनिहाय मंजूर प्रवेश क्षमता संख्या
* कॉलेजचे बँक डिटेल्स
* अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असल्यास आदेश
* उपलब्ध भौतिक सुविधा अभिलेखे
* फी स्ट्रक्चर मान्यतेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव
* इतर आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांनी व पालकांनी करावयाची पुर्वतयारी
* दहावीचे गुणपत्रक
* शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
* डोमिसाईल प्रमाणपत्र
* जातीचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
* नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
* ईडब्लूएस प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
* दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
* खेळाडू असल्यास प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
* फोटो.
सर्व कॉलेज प्रशासन, विद्यार्थी, पालकांनी वरीलप्रमाणे पूर्वीच सर्व कागदपत्रांची जूळवाजूळव केली तर ऐनवेळी कोणतीही धावपळ होणार नाही, असे आवाहन शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे
