या विशेष सत्रात माध्यमशास्त्र संकुल येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. “आजच्या काळात मोबाईल फोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून, ते पत्रकारितेचे आणि स्वयंरोजगाराचे एक प्रगत माध्यम बनले आहे,” असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले.
डॉ. यादव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून दर्जेदार व्हिडिओ चित्रीकरण करणे, बातमीला प्रभावी ‘व्हॉइस ओव्हर’ देणे, आकर्षक टायटल्स तयार करणे आणि ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकग्राऊंड बदलणे तसेच संगीताचा वापर करून व्हिडिओ अधिक परिणामकारक कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून बातमीदारी करून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्गही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या प्रशिक्षण सत्राच्या अध्यक्षस्थानी रासेयो विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड हे उपस्थित होते आपल्या अभिभाषणात रासेयो चे कार्य, महत्त्व आदी माहिती विद्यार्थ्या सविस्तर समजावून सांगितले
याप्रसंगी विद्यापीठ परिसर समन्वयक तथा माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. सुहास पाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात संपूर्ण गावाचा विकास करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे किती गरजेचे आहे हे विविध उदाहरण देऊन पटवून सांगितले
अशा तांत्रिक कौशल्यआधारित उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सामाजिक समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना एक नवे व्यासपीठ व कौशल्य प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन डॉ.पाठक यांनी केले. या शिबिरात जवळपास 54 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मोबाईल जर्नलिझमचे धडे
नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथे आयोजित सात दिवसीय विशेष वार्षिक युवक शिबिरात ‘मोबाईल जर्नलिझम’ (MoJo) या विषयावर विशेष प्रशिक्षण सत्र उत्साहात पार पडले. या शिबिरात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण धडे शिबिरार्थींना देण्यात आले.
