मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजताच्या सुमारास तामसा तांडा शिवारात काही इसम अवैधरित्या जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तामसा पोलीस ठाण्याचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शाहदेव खेडकर,पोलीस अंमलदार नरवटे,बट्टेवार,खान, होमगार्ड राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकली.
या कारवाईत संजय तुकाराम भुमटे (वय ४५, रा. तामसा जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून ०९ मोटारसायकली व रोख रक्कम असा एकूण ५,६३,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.
अवैध जुगार अड्ड्यावर तामसा पोलिसांची धाड ; ५ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
हदगाव (प्रतिनिधी)- तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५ लाख ६३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
