नांदेड ग्रामीणमध्ये जबरी चोरी; चांदीचे दागिने लंपास

नांदेड (प्रतिनिधी)-  नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मौजे गंगाबेट येथील शेतातील आखाड्यावर दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणी दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या अंगावरील सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे.
याप्रकरणी द्रौपदाबाई माणिकराव इरकर (वय ६०, रा. गंगाबेट, ता. जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०९(६), ३३३, ३(५) नुसार नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!