नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील संभाजीनगर परिसरात 15 फेब्रुवारी रोजी घरातून 12 लाख 50 हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत छडा लावत सहा जणांना अटक केली असून, धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी महिलाच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रार आणि तपास 15 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे राहणाऱ्या मंगळ पुषट्टी जंगीलवाड (वय 40) यांनी त्यांच्या घरातून 12.50 लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार दिली. या बाबत गुन्हा क्रमांक 89/2026 दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चौकशीत उघड झाले की, जंगीलवाड यांनीच ही रक्कम आपल्या आई विमलबाई लंकनवाड (रा. ब्राह्मणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांच्या घरी नेऊन ठेवली होती. जप्त मुद्देमाल भाग्यनगर पोलिसांनी एकूण 19 लाख 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात .. रोख रक्कम : ₹12,50,000 7 ग्रॅम सोने (सुमारे ₹1,05,000) 20 तोळे चांदी (₹40,000) बेन्टेक्स दागिने (₹1,800) कार (₹5,00,000) स्कुटी (₹65,000) अटक आरोपी दिनांक 8 व 9 एप्रिल 2026 रोजी पुढील आरोपींना अटक करण्यात आली— आनंद नामदेवराव जाधव (वय 27, व्यवसाय चालक, रा. कावरानगर, नांदेड) राजेश लक्ष्मण पांचाळ (वय 23, रा. सिडको, नांदेड) पूजा दीपक नरवडे (वय 26, रा. काबरा नगर, नांदेड) स्मिता लक्ष्मण पोळ (वय 28, रा. संभाजीनगर कॅनॉल रोड, नांदेड) संध्या विश्वनाथ डोणगे (रा. संभाजीनगर कॅनॉल रोड, नांदेड) मंगळ पोषट्टी जंगीलवाड (फिर्यादी, वय 40) पोलिसांची कारवाई पोलीस उपाधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश माळी, उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गजानन किडे, विष्णुकांत मुंडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, राजीव घुले, अदनान पठाण, अंकुश कांबळे, सविता केळगन्द्रे तसेच सायबर विभागातील दीपक ओढणे यांनी ही यशस्वी कारवाई केली. गुन्ह्यातील शंभर टक्के ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसऱ्या चोरीप्रकरणाचाही उलगडा गुन्हा क्र. 87/ 2026 मध्ये चोरी गेलेले 12 मणी, मंगळसूत्र आणि 5 ग्रॅम सोन्याची पोत असा एकूण सुमारे ₹65,000 किमतीचा ऐवजही भाग्यनगर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एकतानगर येथील अनिल रामा जाधव (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातीलही शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. भाग्यनगर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे दोन्ही गुन्ह्यांचा वेगाने उलगडा झाला असून शहरात कायदा-सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण झाला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,313 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त “कर्मयोगी” प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे कुसुम सभागृह येथे आयोजन सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट