नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वडगाव येथे एका 21 वर्षीय युवकाचा खून झाल्यानंतर 12 तासात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने खून करणाऱ्या पाच जणांपैकी एकाला जेरबंद केले आहे. हा खून जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेला आहे. दि.7 फेबु्रवारी रोजी रात्री 12 वाजेच्या अगोदर मौजे वडगाव येथे आकाश बालाजी पुयड (21) रा.पुयडवाडी ता.जि.नांदेड याचा खून झाला. तक्रारीप्रमाणे वडगाव येथील पवन माणिकराव पुयड (22) आणि इतर चार जणांनी मिळून आकाश पुयडचा खून केला होता. गुन्हा क्रमांक 109/2026 हा 8 फेबु्रवारीच्या पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, सिध्दू सोनसळे, श्रीराम दासरे, माधव माने, संघरत्न गायकवाड, आबाराव पिंगलवाड, लहु चाटे, विश्र्वनाथ पवार, सुधाकर देवकत्ते आदींनी भरपूर मेहनत घेतली आणि माळटेकडी जवळी डॉ.शंकरराव चव्हाण उड्डाणपुलाखाली मारेकरी पवन माणिका पुयडला ताब्यात घेवून त्याला पुढील कार्यवाहीसाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. हा खून जुन्या भांडणाच्या वादावरून झाला. लाथाबुक्या, काठी सोबतच खंजीरने आकाश पुयडच्या पाठीवर, गळ्याखाली , छातीवर वार करून त्याचा खून करण्यात आलेला आहे. मारेकऱ्याला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,163 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation फरांदेनगरमध्ये 1 लाख 63 हजार 600 रुपयांची चोरी शोकातून संशयाकडे… अजित पवार दुर्घटनेवर शंका प्रश्न आणखीन वाढले