नांदेड – नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड 431601 येथे थेट मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे व सोबत बियोडाटा मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे. पात्रता व मापदंड वयोमर्यादा: उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी १८ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. श्रेणी : बेरोजगार/स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य ई. टपाल जीवन विमा प्रतिनिधी साठी थेट असे अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवर चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये एवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरूपात असेल. रुपये 5 हजार एवढी रक्कमेची NSC/KVP अधीक्षक डाकघर यांच्या नावाने प्लेज केल्यावर एजंट आयडी प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. सदर परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स आणि कमिशन तत्वावर राहील असेही आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे. Post Views: 529 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation सोमवार दि.१९ पासून नांदेड मध्ये रंगणार बालनाट्य स्पर्धा;जास्तीत जास्त शाळांनी विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे आव्हान राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी MAHIMA संस्थेची स्थापना