नांदेड – जिल्ह्यात नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025-26 च्या अनुषंगाने गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी रोजी मतदानाच्या दिवशी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी निर्गमीत केला आहे. या आदेशाद्वारे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीला प्रवेश करण्याकरिता गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी प्रतिबंधीत केले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मुख्यालयी मतमोजणी केंद्र परिसरात शुक्रवार 16 जानेवारी, 2026 रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेशास प्रतिबंधित केले आहे.हा आदेश नांदेड जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 640 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बारावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध घाई करा मित्रांनो दारू विक्री बंद