नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्माननगर येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि घरातील सामान असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार चौकमध्ये दोन जणांनी एका डिलेव्हरी बॉयला मारहाण करून 8 हजार 300 रुपयांची लुट केली आहे.
सय्यद जमिलोद्दीन सय्यद हुसामोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या रात्री 9 ते 3 जानेवारीच्या सकाळी 9 वाजेदरम्यान उस्मानपुरा भागातील त्यांचे बंद घरफोडून चोरट्यांनी त्यातून 30 हजार रुपये रोख रक्कम आणि घरातील काही सामान असा एकूण 42 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 6/2026 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मिर्झा बेग अधिक तपास करीत आहेत.
डिलेव्हरी बॉयचे काम करणारे सुरज प्रकाश वटंबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 2 वाजेच्यासुमारास रोहन मुरलीधर उशलवार, रितेश भद्रे आणि एक अनोळखी व्यक्ती या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांचा 6 हजार रुपयांचा मोबाईल आणि 2 हजार 300 रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 10/2025 प्रमाणे दालख केली असून पोलीस उपनिरिक्षक सरावते अधिक तपास करीत आहेत.
एक जबरी चोरी आणि एक घरफोडी
