नांदेड(प्रतिनिधी) -जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी तथा पंचशील स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष प्रेमदास घुले हे वयोमानानुसार आज (बुधवार) दि.31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
प्रेमदास घुले हे जीवन प्राधिकरण कार्यालयात कार्यरत राहून सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असतात. सामाजिक बांधीलकी जोपासत त्यांनी पंचशील स्वंयसहाय्यता बचत गटाची स्थापना केली. त्या गटाच्या माध्यमातून अनेकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. जीवन प्राधिकरण कार्यालयात 35 वर्ष सेवा करुन दि.31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवापूर्ती निमित्त अधिकारी व कर्मचार्यांच्यावतीने प्रेमदास घुले व त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नातेवाईक उपस्थित होते.
प्रेमदास घुले शासकीय सेवेतून सेवानिवृत्त
