पोक्सो गुन्हा घडल्यानंतर किनवट पोलीसांनी 24 तासात आरोपीला पकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबर रोजी घडलेल्या पोक्सो कायद्याच्या घटनेचे दोषारोपपत्र किनवट पोलीसांनी 24 तासात अर्थात 1 जानेवारी 2026 रोजी न्यायालयात दाखल करून आपल्या कामातील तिव्र गतीचे दर्शन घडविले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पोलीस ठाणे किनवटच्या हद्दीतील एका व्यक्तीने एका अल्पवयीन बालिकेसोबत अभद्र व्यवहार केला. या घटनेचा गुन्हा 1 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजून 52 मिनिटाला दाखल झाला होता. या संदर्भाने 1/2026 दाखल करण्यात आला. ज्यामध्ये भारतीय न्याय संहितेची कलमे 74, 79 आणि पोक्सो कायद्याचे कलम 8 आणि 12 जोडण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक देवानंद फडेवार यांच्याकडे देण्यात आला.
किनवटचे पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघणे, किनवटचे पोलीस निरिक्षक गणेश कऱ्हाड यांच्या मार्गदर्शना पोलीस उपनिरिक्षक डी.एस.फडेवार, एस.एस.झाडे, पोलीस अंमलदार जी.एस.डुकरे, अत्राम, वाघमारे, सुनिल अन्नमवार, माहुरे, वाघमारे आणि महिला पोलीस अंमलदार कुऱ्हे यांनी अत्यंत जलदगतीने कायद्याला अपेक्षीत सर्व बाजू अत्यंत तिव्रगतीने पुर्ण केल्या आणि 1 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. ज्यामुळे तिव्र गतीचे काम कसे असते किंबहुना कसे करावे हे किनवट पोलीसांनी दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!