पुर्णा(प्रतिनिधी)-जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुल पुर्णा येथील 5 बालक-बालिकांनी 15 व्या राष्ट्रीय आणि 8 व्या अंतरराष्ट्रीय ऍबॅक्स या शिक्षणात पुणे येथे बक्षीसे जिंकून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. सोबतच पुर्णा येथील ऍबॅक्स शिक्षीका जया वाघमारे(कांबळे) यांचा सुध्दा अंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट शिक्षीका म्हणून सन्मान करण्यात आला.

28 डिसेंबर रोजी पुणे येथे 15 वी राष्ट्रीय आणि 8 वी अंतरराष्ट्रीय ऍबॅक्स स्पर्धा झाली. त्यात जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुल पुर्णाच्यावतीने निमालू अंशकृष्ण, मुडापड्डी पहल विजय भास्कर, सारंग शांभवी सचिन, शेख अंजुम शेख मेहराज जावेरीया, भार्गवी कपिल सरोदे आणि श्रेयस बाबासाहेब कांबळे यांनी अनेक पुरस्कार जिंकले. या ऍबॅक्स स्पर्धेमध्ये जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुल पुर्णाच्यावतीने ऍबॅक्स शिक्षीका जया वाघमारे (कांबळे) यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचा सुध्दा अंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट ऍबॅक्स शिक्षीका म्हणून सन्मान झाला.

