नांदेड(प्रतिनिधी)-14 डिसेंबर रोजी हर्षू ठाकूर या महिलेने पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उभे राहुन मुस्लिम समाजाच्या नमाजची आजान होत असतांना डुकरांचे भोंगे बंद करा असे ओरडून युवकांना चिथावणी दिली. या संदर्भाने करीष्मा किशनसिंह परिहार उर्फ हर्षू ठाकूरचा हा प्रयत्न दोन समाजात दंगल घडविण्याचा प्रयत्न आहे. तिची इस्टाग्राम आयडी कायमची बंद करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारा अर्ज अनेक मुस्लिम युवकांनी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिला असून अनेक युवक सामाजिक संकेतस्थळांवरून कार्यवाहीची विनंती करत आहेत.
14 डिसेंबर रोजी हर्षू ठाकरू या छत्रपती संभाजीनगर येथील युवती एका खाजगी भांडण्याच्या संदर्भाने नांदेडला आल्या होत्या. त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात सुध्दा जोर-जोरात ओरडून गोंधळ घातला. त्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर रास्ता रोको करत असतांना त्याचवेळी सायंकाळच्या नमाजसाठीची अजान झाली. त्यावेळी हर्षू ठाकूर यांनी या डुकरांचे भोंगे बंद करा असा शब्द प्रयोग केला. हा शब्द धार्मिक दृष्टीकोणातून चुकीचाच आहे. सोबतच हर्षू ठाकूर यांनी एस.पी.ऑफीस, एस.पी.ऑफीस समोरील रस्त्यावरच्या व्हिडीओ क्लिप आपल्या इस्टाग्राम आयडी @harsuthkur4747 यावरून प्रसारीत पण केल्या.
रास्ता रोको संदर्भाने वजिराबाद पोलीसांनी हर्षू ठाकूर आणि इतर नऊ जणांविरुध्द जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचा भंग केला अशा स्वरुपाचा गुन्हा सुध्दा दाखल केला आहे. या संदर्भाने अनेक मुस्लिम युवकांनी सुध्दा आपल्या इस्टाग्रावर वरून हर्षू ठाकूरच्या कृतीचे उत्तर दिले आहे. या संदर्भाने अनेक मुस्लिम युवकांनी आम्ही सामाजिक सौहार्दासह राहतो आणि आमच्यामध्ये धार्मिक कृतीचा उल्लेख करून आमच्यासाठी अर्थात मुस्लिम समाजासाठी डुकर या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे ते शब्द प्रक्षोभक भाषणामध्ये येतात. म्हणून हर्षू ठाकूर विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांची इस्टाग्राम आयडी @harsuthkur4747 कायमची बंद करून नंादेडमध्येक येण्यावर प्रतिबंध करावा असा अर्ज खडकपुरा येथील शब्बर बेग गफार बेग यांनी 16 डिसेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात दिला आहे. इतरही अनेक युवकांनी आप-आपल्या सामाजिक संकेतस्थळावरून हर्षू ठाकूरला उत्तरे दिली आहेत. सोबतच प्रशासनाला विनंती केली आहे की यावर कायम उपाय योजना करावी.
काही महिन्यापुर्वी अधिवक्ता परिषद अवध प्रान्ताची बैठक झाली. त्यात त्यांच्या एप्रिल-जून 2025 च्या न्यायप्रवाह या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या पुस्तिकेमध्ये ऍड. श्रीनिवास मुर्ती यांनी एक संपादकीय लिहिले आहे. त्यानुसार आम्ही सर्व एकत्र आहोत. यासाठी वकीलांनी प्रयत्न करण्याची गरज सांगितली आहे. इतरांच्या सुखात आणि दु:खात सहभागी होवून समरस्ता अर्थात सामाजिक सलोखा टिकवला पाहिजे. यासाठी बार असोसिएशन आणि न्यायालयाच्या दालनातून याची सुरूवात व्हावी. त्यानंतर आम्ही समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटून आम्ही एक आहोत याचा प्रचार करू असे लिहिले आहे.
एकंदरीतच सामाजिक सलोखा बिघडेल असे अनेक व्हिडीओ हर्षू ठाकूर यांच्या आयडीवर आहेत. सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना नक्कीच प्रशासनाने करायला हवी.
नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने सुध्दा काल या संदर्भाने एक प्रसिध्द पत्रक जाहीर करून सांगितले आहे की, करीष्मा किशनसिंह परिहार उर्फ हर्षू ठाकूर विरुध्द नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात घडलेल्या 14 डिसेंबरच्या घटनेनुसार हर्षू ठाकूरसह इतर आंदोलनकर्त्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 502/2025 दाखल करण्यात आला आहे. सोबतच विविध प्रसार माध्यमांवर अपूर्ण व चुकीच्या माहितीच्या आधारावर रिल्स पसरत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकते. म्हणून रिल्सवर जनतेने विश्र्वास ठेवू नये, त्या प्रसारीत करू नये. नागरीकांनी विश्र्वासहार्य स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीलाच महत्व द्यावे.
मुस्लिम समाजाबद्दल प्रक्षोभक बोलल्याबद्दल हर्षू ठाकूर विरुध्द कार्यवाहीची मागणी
