श्रीक्षेञ माहूर -महाराष्ट्रातील सुप्रसिध्द भागवत प्रवक्ते आचार्य ज्ञानेश्वर भारती महाराज (बाळु महाराज ) श्रीक्षेञ माहूरगड यांना देशातील नामांकित उत्तर प्रदेश राज्यातील हिंदू धर्माचे सर्वात मोठे देवस्थान मानलेल्या वाराणसी येथील हिंदी युनिव्हर्सिटी विद्यापीठाचा प्रतिष्ठित मानस डि.लीट पदवी प्रदान करण्यात आली. हा भव्य दिव्य सोहळा वाराणसी येथे संपन्न झाला.या सोहळ्याला साधु संताची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

तिर्थक्षेञ असलेल्या माहूरगडाचे ज्ञानेश्वरी भारती महाराज (बाळु महाराज ) यांनी श्रीमद् भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, शिव पुराण व इतरही ग्रंथाच्या माध्यमातून व समाज जागृती, धार्मिक, सामाजिक, समाज प्रबोधन पूर्ण देशभर अखंड सेवा त्यांची सुरू आहे.ज्ञानेश्वर भारती महाराजांनी आपल्या संसाराचा त्याग करीत वैराग्याचा ध्वज हाती घेत जगाच्या कल्यानासाठी राञीचा दिवस एक करीत जगभर भ्रमण करीत उपदेश देण्याचे कार्य हाती घेतले आहे.ऐवढेच नव्हे तर त्यांनी सहवासात असलेल्या अनेकांना व विद्यार्थांना त्यांनी चांगल्या व्यासपीठापर्यंत पोहचविले आहे. हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व गो मातेचे रक्षण हा त्यांचा मुख्य उद्देश आसून पूर्ण भारतभर त्यांचा प्रवास सुरू असतो,अशा एक न अनेक गोष्ठीचा दाखला घेत वाराणसी येथील संस्थेने त्यांना मानद डी.लीट हा पुरस्कार प्रदान करीत त्यांना सन्मानित केले आहे.महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावा केला व करीत आहे.
या गौरव सोहळ्यात सुखमंगल सिंह मंगल कुलदीपती यांच्या हस्ते ज्ञानेश्वर भारती यांचा औपचारिक स्वागत व सत्कार व अभिनंदन करण्यात आले, या सोहळ्यात डॉ.संभाजी बाविस्कर कुलपती व इंद्रजीत तिवारी विभीक कुलसचिव व अनेक साधुसंत मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
