नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणारा एक हायवा, पाण्यात तरंगणारे तिन तराफे, एक इंजिन, दहा ब्रास वाळू असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे दाखल केले आहेत. या दोन गुन्ह्यांमध्ये आरोपीचे नाव एक आहे आणि तो चालक आहे. दुसऱ्या एका आरोपीचे नाव अज्ञात आहे. म्हणजे या सर्व साहित्याचा मालक कोण हे बहुदा तपासात शोधले जाईल.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता असर्जन गोदावरी पात्राजवळ तपासणी केली. तसेच त्याच रात्री 11.45 वाजता अदनान गार्डन धनेगाव समोर तपासणी केली. यामध्ये पोलीसांनी एम.एच.26 एस.एफ.7699 हा हायवा 40 लाख रुपये किंमतीचा तसेच 10 ब्रास वाळू 50 हजार रुपये किंमतीचे तसेच पाण्यात तरंगणारे तिन तराफे दीड लाख रुपयांचे आणि पाण्यातून अवैध वाळू उपसार करणारे इंजिन 3 लाख रुपयांचे असा एकूण 45 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलीस अंमलदार जमीर शफीर अहेमद यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 1102, 1103/2025 असे दोन गुन्हे दाखल केली आहेत. यामध्ये आरेापींची नावे देतांना शुभम विठ्ठल सावते (24) व्यवसाय चालक रा.आमुदरा आणि इतर एक अज्ञात असे लिहिले आहे. म्हणजे या 45 लाख रुपयांच्या साहित्याचा मालक कोण आहे हे बहुदा तपासात पुढे येईल.
पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, मुपडे, सुर्यकांत चाटे, शेख जमीर, शेख आसीफ, धम्मपाल कांबळे आदींनी ही कार्यवाही केली.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका हायवासह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
