

ही तीच राधिका खेडा पूर्वी काँग्रेसमध्ये मीडिया प्रभारी, नंतर भाजपांत उडी, आणि आज स्वतःला नैतिकतेची आरती करणारी ठरवते. जर विरोधी पक्षनेता अशा “पॅटर्न”मध्ये सहभागी असतील, तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री काय हातात बांगड्या भरून बसले आहेत का? उलट, जर खरोखर असे काही असेल, तर मोदी-शहा यांनीच राजीनामा द्यायला हवा,असे तिनेच शिकवण दिलेली!यानंतर ती एका व्हिडिओची पाटी लावते. राहुल गांधी एका तरुण मुलीसोबत दिसत आहेत. लगेच भाजप IT सेलचा चेहऱ्यावर हसू, आणि सुरुवात घाणेरड्या आरोपांची. अरुण यादव नावाचा एकजण लिहितो. काँग्रेसचा “५६ वर्षांचा झंड-नायक” विदेशात “नवीन योजना” घेऊन फिरतो! हे लोक लोकशाहीत नेता म्हणवून घेतात आणि बोलतात मात्र रस्त्यावर उभ्या गुंडापेक्षा वाईट भाषेत. खोटं पसरवणं, चिखलफेक करणं ही यांची नेहमीची सवय. त्यांच्यावर आक्षेप घेणारा कोणी नसल्याने त्यांच्या घाणेरड्या कल्पनांना पंख फुटतात.नंतर धावून येतात डॉ. राधा मोहनदास अग्रवाल हे तेच डॉक्टर जे एके काळी योगी आदित्यनाथ यांनाही शिवीगाळ करत. पण भाजपात गेल्यावर अचानक संतगिरी प्राप्त! ते म्हणतात हा व्हिडिओ एआय असेल तर बोगस गांधी कुटुंबाने तपासणी मागावी, आणि खरा असेल तर त्या मुलीची ओळख सांगा! म्हणजे देशातील आरोग्य व्यवस्था सांभाळण्याऐवजी हे सज्जन राहुल गांधींच्या खांद्यावरचा हात तपासत बसतात!
आणि खरी गोष्ट काय?
ज्या मुलीला “युवती” म्हणून दाखवले ती म्हणजे प्रियंका गांधी यांची मुलगी. म्हणजेच राहुल गांधींची भाची. कौटुंबिक नात्यावर इतकी गलिच्छ टीका करण्याची हिंमत भाजपने कुठून आणली? रक्ताच्या नात्यालाही हे लोक घाणेरड्या राजकारणाचा विषय बनवतात.१० नोव्हेंबरला दिल्लीमध्ये आतंकवादी हल्ला झाला. १३ नोव्हेंबरला तो “आतंकी” म्हणून घोषित झाला. आणि १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भाजपच्या व्हॉट्सअॅप विद्यापीठातून हा घाणीचा पूर वाहू लागला. नेहमी घटना घडली की हल्लेखोर कोण, उद्देश काय ? यावर चर्चा होते. पण या वेळी थेट राहुल गांधींवर नजर. भारताच्या सुरक्षेतील अपयश झाकण्यासाठी भाजपचा आयटी सेल नेहमीप्रमाणे गंध आणि घाण पसरवायला मैदानात उतरला.हा सारा प्रकार कटाक्षाने नियोजनबद्ध होता. आणि काय आश्चर्य! ज्यावर घाणेरडी कॉमेंट केली. तो व्हिडिओ सप्टेंबर २०२५ चा. कार्यक्रमात प्रियंका गांधी, राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा, मुलगी सगळे होते. पण निवडून घ्या तोच फ्रेम ज्यात राहुल गांधी आणि त्यांची भाची दिसतात. आणि सुरू करा खालच्या पातळीचे राजकारण!राधिका खेडाचे राजकीय चरित्रही भन्नाट. काँग्रेसमध्ये मीडिया समन्वयक, नंतर जनकपुरीतून निवडणूक ज्यात तिला फक्त २०१४ मते! विजेत्याला ६५ हजार. जामीन जप्त. आणि नंतर काँग्रेस सोडताना म्हणाली मी श्रीराम मंदिरात गेले, म्हणून काँग्रेसने मला विरोध केला! पण प्रत्यक्षात छत्तीसगडमध्ये तिची काही बिलं अडकली होती ही खरी गोष्ट.
आतंकी हल्ल्यावरील प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, “ऑपरेशन सिंदूर” कुठे गायब झाले. हे सांगता येत नाही. म्हणून राहुल गांधींना टार्गेट. पाकिस्तान, तुर्कस्तान, एआय व्हिडिओ जशी हवा तशी गोष्ट बदलणे हा भाजपचा नेहमीचा उद्योग.निवडणुकीच्या आदल्या दिवशीच हा सर्व गदारोळ निर्माण करणे ही तर नेहमीचीच स्क्रिप्ट. हेमंत अत्री आणि आशिष चित्रांशी म्हणतात,निवडणुकीवर परिणाम करण्याचा हा उघड उघड प्रयत्न.मामा–भाचीसारख्या पवित्र नात्यावर चिखलफेक,हा प्रकार भारतीय राजकारणातल्या सर्वात गलिच्छ अध्यायांपैकी एक. अशा महिला, अशा नेत्यांना स्वतःच्या घरी बहिणी, मुली, भाच्या नाहीत का? त्यांच्या नात्यावर अशी टीका केली तर कसे वाटेल? पण राजकीय लाभ दिसला की हे लोक कोणत्याही पातळीवर उतरू शकतात,खालच्या पातळीपर्यंत.
नेहरूंचा मृत्यू होऊन साठ वर्षे झाली, तरीही त्यांच्यावरही खोटे फोटो व्हायरल करून अपमान. कधीकाळी राहुल गांधींच्या घराच्या दाराजवळ स्वतः उभ्या राहणाऱ्या राधिका खेडा आज त्यांच्याविरुद्धच घाणेरडे आरोप करतात हेच भाजपचे रूप.सुप्रिया श्रीनेत यांचे उत्तर स्पष्ट होते—“२०२५ चा कौटुंबिक व्हिडिओ लंडनच्या नावावर टाकून खोटे पसरवणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरले आहे.” आणि हे खरंच आहे; कारण या आयटी सेलच्या डोक्यात चिखल वगळता काही नाही.मीडिया तर जिवंत लोकांना मृत दाखवतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला अटक झाली असेही दाखवले. हे पत्रकार नसून कथाकार! अखिलेश यादव म्हणतात“या चॅनलवर विश्वास ठेवला तर तुम्ही बुडून जाल.”
म्हणजे सरतेशेवटी ..
घटना गंभीर असली, तरी भाजपचा आयटी सेल तिचाही फायदा उचलून घाण, चिखलफेक आणि राजकीय विषारी प्रचार करायला तयार असतो.देश जळत असताना यांना दिसते फक्त राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवलेला हात.आणि त्याही हातात त्यांना परदेशी कट दिसतो!

